शेतक:यांची पोरं घडविणारा ‘द्रोणाचार्य’

By Admin | Updated: July 10, 2014 01:19 IST2014-07-10T01:19:38+5:302014-07-10T01:19:38+5:30

अजरुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होऊ नये म्हणून प्रसंगी एकलव्याच्या हाताचा अंगठा घेणारे द्रोणाचार्य सर्वश्रुत आहेत़

Farmer: 'Dronacharya' | शेतक:यांची पोरं घडविणारा ‘द्रोणाचार्य’

शेतक:यांची पोरं घडविणारा ‘द्रोणाचार्य’

उस्मानाबाद : अजरुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होऊ नये म्हणून प्रसंगी एकलव्याच्या हाताचा अंगठा घेणारे द्रोणाचार्य सर्वश्रुत आहेत़ मात्र, प्रत्येक कष्टकरी शेतक:याचा आपल्या शाळेतील मुलगा गुणवंत व्हावा यासाठी सतत धडपडणारा ‘द्रोणाचार्य’ म्हणून कसबेतडवळे येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ धायगुडे यांना ओळखले जाऊ लागले आह़े या शिक्षकाने 11 वर्षात तब्बल 56 विद्याथ्र्याना नवोदयसाठी पात्र ठरविल़े तर शिष्यवृत्ती, एमटीएसमध्ये अनेक विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीधारक बनविल़े 
जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या ही राज्यात एक मोठी समस्या बनली आह़े गोरगरिबांची मुलं ज्या शाळेत शिकतात तेथीलच गुणवत्ता खालावली आह़े मात्र, याला अपवादापैकी एक ठरली ती कसबेतडवळे या ऐतिहासिक भूमीतील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा! शाळेतील शिक्षक जगन्नाथ धायगुडे यांचा यात सिंहाचा वाटा!  शाळेची गुणवत्ता पाहता खासगी शाळेऐवजी याच शाळेकडे अनेक पालकांचा कल आह़े परिसरातील खेडय़ा-पाडय़ातील नव्हे, उस्मानाबाद शहरातील काहींनी आपल्या मुलांना या शाळेत घातले आह़े हालाखीच्या परिस्थितीतून ऑगस्ट 1991मध्ये शिक्षक म्हणून घुलेवाडी (ता़ भूम) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर रुजू झालेल्या धायगुडे यांनी शेतक:यांची पोरं गुणवत्ताधारक बनविण्याचा जणू पणच केला़ 1995 साली देवधानोरा येथे कार्यरत असताना नवोदयसाठी 5 आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्याथ्र्याना पात्र ठरविण्यात मोठा वाटा उचलला़ 2क्क्3पासून कसबेतडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर ग्रामस्थांची त्यांना मोलाची साथ मिळाली़ एमटीएस परीक्षेत चालू वर्षी 5, शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 29 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविले आहेत़ धायगुडे यांनी  5वी, 6वी आणि 7वीतील नवोदय, एमटीएस, शिष्यवृत्ती परीक्षेला बसणा:या विद्याथ्र्याचे दरोज चार तास जादा घेण्याचा उपक्रम राबविला आह़े वर्षातून 4क् ते 45 परीक्षा घेतल्या जातात़ विद्याथ्र्याकडून तलाठी, ग्रामसेवकासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेत चांगल्यात चांगली तयारी करण्यात येत़े कष्टक:यांच्या मुलांना गुणवत्तेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याकडे नेणा:या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर तडवळ्याचा ‘नवोदय पॅटर्न’ उभा करणा:या धायगुडे यांना जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आह़े
 
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग : धायगुडे वर्षभरातील विविध परीक्षेत 85 टक्क्यांहून अधिक गुण घेणा:या विद्याथ्र्याचा लोकसहभागातून जवळपास 15 हजारांची पारितोषिके देऊन सन्मान केला जातो़ लोकसहभागातून एक लाख रुपये खर्च करून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आह़े येथील ग्रामस्थ  मदतीसाठी हात पुढे करतात, असे मुख्याध्यापक दादा सुतार यांनी सांगितल़े
 

 

Web Title: Farmer: 'Dronacharya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.