शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:04 IST

पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता.

मुंबई: सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले धुळयाचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया अखेर पार पडली आहे. त्यानुसार धर्मा पाटील यांच्या वारसांना संपादित केलेल्या जमिनीसाठी 54 लाखांचा मोबदला मिळणार आहे.  धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. यापूर्वी सरकारकडून याच जमिनीचे भूसंपादन केल्यानंतर सरकारने पाटील कुटुंबीयांना अवघ्या ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला दिला होता. दरम्यान, सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या मोबदल्यात मनरेगा कायद्यातील तरतुदीनुसार सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. तसेच संपादनावेळी या जमिनीवर असलेल्या आंब्याच्या झाडांचे मूल्यही विचारात घेण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडून धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.दोंडाई येथे उभारण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली होती. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला. तर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतमालकास गुंठाभर जमिनीसाठी एक कोटी ८९ लाखांचा मोबदला मिळाला होता. धर्मा पाटील यांना हा मोबदला मान्य नव्हता. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती होती. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, सरकारकडून न्याय न मिळाल्याने २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलfarmer suicideशेतकरी आत्महत्याBJPभाजपा