शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 06:41 IST

एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही.

अतुल कुलकर्णी -मुंबई : लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या जोरावर अनेक अभिनेत्रींना नावलौकिक मिळाला. त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे अनेक अभिनेत्रींची कारकीर्द बहरली, फुलली. आपल्यासाठी एक गाणे दीदींनी गावे म्हणून वाट्टेल ते करण्यासाठी तयार होणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी दीदींच्या अंत्यसंस्कार आणि अंतिम दर्शनाकडे मात्र पाठ फिरवली. ‘दिल दिवाना बिन सजना के...’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या भाग्यश्रीने दीदींच्या घरी भेट दिली. ऊर्मिला मातोंडकर, विद्या बालन, श्रद्धा कपूर आल्या. मात्र बाकीच्या आल्याच नाहीत, याची चर्चा प्रत्येकजण करत होता.एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही. मात्र हे गाणे लता मंगेशकर यांचे आहे असे सांगणारे लाखो सापडतील. अनेक अभिनेत्रींचे नाव केवळ अशा गाण्यामुळे इतिहासात लिहिले गेले. अमुक एखाद्या अभिनयासाठी लक्षात राहिलेल्या अभिनेत्री किती आणि गाण्यासाठी लक्षात राहिलेल्या किती? असा प्रश्न केला तर फार कमी अभिनेत्रींची नावे समोर येतील. हे केवळ लता मंगेशकर यांच्या जादूभऱ्या अनवट सुरावटींमुळे शक्य झाले. एकेका गाण्यासाठी त्यावेळी संगीतकार आणि गायक जी मेहनत घेत होते त्यामुळे हे साध्य झाले होते.‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘दिल तो पागल है’, अशी सुंदर गाणी माधुरी दीक्षितला मिळाली. ‘मेरे ख्वाबो में जो आये...’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्यांनी काजोलची कारकीर्द बहरली. ‘आजा पिया तोहे प्यार दूं...’ गाण्यामुळे आशा पारेख, ‘कांटों से खींच के ये आँचल’ गाण्यासाठी वहिदा रहेमान, ‘होठों में ऐसी बात में दबाके चली आयी’ या गाण्यामुळे वैजयंतीमाला, ‘नाम गूम जायेगा’ गाण्यासाठी हेमा मालिनी लक्षात राहतात.जया बच्चन कोरोनामुळे आजारी आहेत. मात्र अमिताभ बच्चन स्वत:च्या मुलीसह आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात व्यस्त व्यक्ती. ते आवर्जून आले. मात्र ज्यांच्यासाठी लता मंगेशकर यांनी स्वत:चा आवाज दिला त्यातील एकाही अभिनेत्रीला रविवारी लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनाला यावे वाटले नाही. यातल्या अनेक अभिनेत्री विविध चॅनलवर चालणाऱ्या गाण्यांच्या रिॲलिटी शोमध्ये अनेकदा दिसल्या. तिकडे जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळतो, मात्र त्यांना इकडे मात्र फिरकावे वाटले नाही, यासारखे दुर्दैव कोणते, अशा शब्दात अनेकांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.

- गापूजी गापूजी : पूनम ढिल्लोन - आ जाने जा.., इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात : हेलन- नीला आसमां सो गया : रेखा- शीशा हो या दिल हो :  रीना रॉय- रिमझिम गिरे सावन सुलग सुलग,  मुझे छु रही है :  मौसमी चॅटर्जी- ए री पवन, ढूंढे तुझे मेरा मन : राखी 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा