पुणे बॉम्बस्फोटाची खोटी ‘टिप’ देणा:यास अटक

By Admin | Updated: July 20, 2014 02:47 IST2014-07-20T02:47:39+5:302014-07-20T02:47:39+5:30

‘टिप’ देणा:या बशीर अहमद गोगलु या काश्मिरी युवकाने दिलेली माहिती खोटी ठरल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने त्याला अटक केली आहे.

False tip tip of Pune bomb blast: arrested on this | पुणे बॉम्बस्फोटाची खोटी ‘टिप’ देणा:यास अटक

पुणे बॉम्बस्फोटाची खोटी ‘टिप’ देणा:यास अटक

डबल गेम : कजर्फेड टाळून वर बक्षिशी घेण्याचा डाव, पैेसे देणा:यांनाच गोवले
डिप्पी वांकाणी - मुंबई
पुण्यात गेल्या आठवडय़ात फरासखाना भागात झालेला बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला याविषयी ‘टिप’ देणा:या बशीर अहमद गोगलु या काश्मिरी युवकाने दिलेली माहिती खोटी ठरल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने त्याला अटक केली आहे. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील 25 वर्षाच्या या युवकाने दिलेली माहिती तपासाअंती केवळ खोटीच ठरली नाही, तर बशीर ‘डबल गेम’ खेळण्याचा प्रयत्न करीत होता, असेही पोलिसांचे म्हणणो आहे.
काही दिवसांपूर्वी बशीर विशेष शाखेच्या कार्यालयात स्वत:हून आला. पुण्याच्या बॉम्बस्फोटामागील सूत्रधारांविषयी आपल्याकडे माहिती असल्याचे सांगू लागला, तेव्हा पोलिसांना सुरुवातीस धक्काच बसला. नजीद शहा, मुदस्सर नझर आणि साजीद फैयाज मलिक या हिजबुल मुजाहिदीनच्या तीन हस्तकांनी पुण्यातील स्फोट घडवून आणला व या तिघांची बॉम्बस्फोट करून मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सही उडवून देण्याची योजना आहे, अशी धक्कादायक माहिती बशीरने पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, बशीरने दिलेल्या माहितीची आम्ही शहानिशा केली व ती धादांत खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने पुण्याच्या बॉम्बस्फोटाच्या संदर्भात ज्या तिघांची नावे घेतली त्यापैकी कोणीही कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नाही व बशीरने पोलिसांची दिशाभूल केली, असे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो.
 
बनवाबनवी
बशीरचा ‘डबल गेम’चा हेतू होता, असे सांगताना अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बशीरने ज्या तिघांची नावे सांगितली त्यांच्याकडून त्याने पैसे उसने घेतले होते. पैसे परत न केल्याने त्यांनी बशीरच्या मागे तगादा लावला होता. त्यांना अशा प्रकारे अडकविले की आपल्याला त्यांना पैसेही परत करावे लागणार नाहीत आणि वरून दहशतवाद्यांविषयी ‘टिप’ दिल्याबद्दल पोलिसांकडून बक्षिशीही मिळेल, असा त्याचा दुहेरी डाव होता.

 

Web Title: False tip tip of Pune bomb blast: arrested on this