शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्तीच्या नावे बनविले खोटे प्रतिज्ञापत्र, निरक्षर व्यक्तीची इंग्रजीत सही; BJP आमदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 06:17 IST

मृताच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मायणी (जि. सातारा) :

मृताच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. 

मायणीतील वडिलोपार्जित जमीन  असून तिची वहिवाट महादेव भिसे आणि त्यांचे भाऊ करीत आहेत. त्यांचे वडील पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मृत्यू झाला. वडिलोपार्जित मिळकत गट नंबर ७६९ लगत गट नंबर ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणीतर्फे तत्कालीन अध्यक्षांच्या मालकी कब्जे वहिवाटीची आहे. संबंधित मिळकत संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी सहायक संचालक नगररचना सातारा यांच्या कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याप्रमाणे संबंधित रस्त्याची रुंदी मंजूर सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार १५ मीटर इतकी आवश्यक असल्याने गट नंबर ७६९ मधून जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असणे बंधनकारक होते.माण-दहिवडी तहसीलदार यांच्यासमक्ष ११ डिसेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्र नं. ४३००/२०२० ने नोंदले आहे. त्यात मयत पिराजी भिसे यांचे बनावट आधारकार्ड बनवून व्यक्ती उभी केली गेली. 

दत्तात्रय घुटुकडे, महेश बोराटे यांना साक्षीदार दाखवले. प्रतिज्ञापत्रासाठी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याहस्ते दत्तात्रेय घुटुकडे (रा. विरळी, ता. माण) यांच्या नावे मुद्रांक घेऊन जयकुमार गोरे, दत्तात्रय घुटुकडे, महेश बोराटे आणि पिराजी भिसे यांच्यानावे प्रतिज्ञापत्र  करणारी अनोळखी व्यक्तीसह पाच जणांनी भिसे कुटुंबाची फसवणूक केली आहे.निरक्षर व्यक्तीची इंग्रजीत सहीपिराजी भिसे यांचा आधारकार्ड नंबर ९०१३ १५२० १५९५ असून, प्रतिज्ञापत्रात दिलेला आधारकार्ड नंबर ५०७२ १५७८ ८२१३ असा आहे. वडिलांचे चुकीचे नाव म्हणजे विष्णू पिराजी भिसे या नावाचे बनावट आधारकार्ड तयार केले. पिराजी भिसे हे निरक्षर असताना त्यांनी प्रतिज्ञापत्रावर इंग्रजीत सही केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपा