शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या दोन मार्गांवर ‘बिघाड’वार

By admin | Updated: December 25, 2014 02:17 IST

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारचा दिवस हा प्रवाशांसाठी ‘बिघाड’वारच ठरला. सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी स्थानकाजवळ

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारचा दिवस हा प्रवाशांसाठी ‘बिघाड’वारच ठरला. सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी स्थानकाजवळ विद्युतपुरवठा बंद झाल्याने आणि त्यानंतर दुपारी मध्य रेल्वेमार्गावरील सायनजवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याने दोन्ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास अंधेरी स्थानकाजवळ रेल्वेला होणारा विद्युतपुरवठा बंद झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद झाली आणि पश्चिम रेल्वेला ‘ए’ मार्करवर सिग्नल यंत्रणा सुरू ठेवणे भाग पडले. त्यामुळे अंधेरी स्थानक आणि तेथून अप आणि डाऊनला जाणाऱ्या धिम्या आणि जलद लोकल सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावरील सायन ते माटुंगा दरम्यान अप (सीएसटी दिशेने) धिम्या मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास रुळाला तडा गेल्यामुळे या मार्गावरील लोकल विद्याविहार ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आणि लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. (प्रतिनिधी)