२७०० कोटींच्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे फटका

By Admin | Updated: February 26, 2015 05:54 IST2015-02-26T05:54:18+5:302015-02-26T05:54:18+5:30

एमयूटीपी-२ मधील अनेक प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांची किंमत तब्बल २ हजार ७00 कोटींनी वाढली आहे. त्यामुळे या रखडेल्या प्रकल्पांना रेल्वे

Failure of projects worth Rs 2700 crores | २७०० कोटींच्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे फटका

२७०० कोटींच्या रखडलेल्या प्रकल्पांमुळे फटका

मुंबई : एमयूटीपी-२ मधील अनेक प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांची किंमत तब्बल २ हजार ७00 कोटींनी वाढली आहे. त्यामुळे या रखडेल्या प्रकल्पांना रेल्वे अर्थसंकल्पातून गती देण्याचे काम करण्यात येईल, अशी अपेक्षा प्रवाशांनी बाळगली आहे.
या प्रकल्पांची एकूण किंमत सुरुवातीला पाच हजार ३०० कोटी रुपये होती. एमयूटीपी-२ प्रकल्प २००८-०९ मध्ये मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात प्कामाला २०१० नंतरच सुरुवात झाली. प्रकल्पामध्ये राज्य सरकार आणि रेल्वे हे ५०:५० टक्के भागीदार आहेत. त्यामुळे या दोघांकडूनही प्रत्येक वर्षी निधी देण्यात येतो. मात्र एमयूटीपी-२ मधील प्रकल्पांचा खर्च गगनाला भिडल्याने यातील प्रकल्प पूर्ण करण्यास एमआरव्हीसीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Failure of projects worth Rs 2700 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.