शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत बिघाडी?, अपक्ष आमदारांवर गद्दारीचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:58 IST

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. संजय राऊतांच्या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार देवेंद्र भुसार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदेंनी महाविकास आघाडीलाच मतदान केलंय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटलांनी दिलीये.

राष्ट्रवादीकडूनआरोपांचंखंडनसंजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं राष्ट्रवादी काँग्रेसने खंडन केलं आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे. या निवडणुकीत मी आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा काउंटिंग एजंट होतो. माझ्यासह सुनील तटकरे आणि संजय खोडके यांच्यावर, या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं आहे किंवा नाही, याची खात्री केली आहे.” “तयामुळं त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी संशोधन झालं पाहिजे,” असा चिमटाही आमदार अनिल पाटलांनी संजय राऊत यांना काढलाय.

संजय राऊतांनी केले होते गंभीर आरोपराज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. आमच्या मित्र पक्षांनीच दगाबाजी केल्याचा आरोप करत राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावेही घेतली होती. “राज्यसभा निवडणुकीत ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला नाही. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत,” असा दावा संजय राऊत यांनी केला. “काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस