फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक - विरोधकांचे टीकास्त्र
By Admin | Updated: July 12, 2015 16:59 IST2015-07-12T15:02:20+5:302015-07-12T16:59:01+5:30
राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एकंदरीत फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीने केली आहे.

फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक - विरोधकांचे टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एकंदरीत फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीने केली आहे.
उद्यापासून राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत फडणवीस सरकारवर आगपाखड केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदील झाला आहे, शेतक-यांना कर्जपुनर्गठनाऐवजी संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमांवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सरकारमधील मंत्रीच गृहखात्याच्या कारभावार टीका करत आहे याकडेही विरोधी पक्षांनी लक्ष वेधले.