शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:56 IST

Sanjay Raut : आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील नाट्यमय घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. तर मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे उजवे हात असून आता दोघांना एकत्र राज्याचा कारभारी पुढे न्यायचा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की,  त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युती झाली असती तर आज ते मोठ्या पदावर असते. त्यावेळी त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं. मात्र फडणवीस यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसते. शिवसेना फोडण्याचा प्लॅन त्यांनी पूर्ण केला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे सेनेचे सुत्र आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच, पहिल्या दिवसापासून सरकार पडेल असे कोणतही वक्तव्य करणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. याशिवाय, शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने घेतले असेल तर त्याचा आनंद आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी - एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ