शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अजितदादांसोबत रातोरात सत्ता स्थापन करण्याचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:37 IST

दोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

मुंबई- राज्याच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला मोठा भूकंप झाला होता. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. दोन भिन्न विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबरोबर सत्ता स्थापन करण्यासंदर्भात मोठा खुलासा केला.शरद पवारांशी एकत्र येण्यासंदर्भात का बोलला नाहीत, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, अजितदादांनी मी पवारांशी बोललो आहे, असा विश्वास दिला होता. अजित पवार राज्यपालांना रात्रीतच आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तर ते आमच्याकडे आलेले होते. साहेबांना मी ही भूमिका सांगितलेली आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे अजित पवारांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या बऱ्याच आमदारांना माहीत होती, त्यामुळे भाजपासोबत ते का आले, याचं उत्तर अजित पवारच देऊ शकतील, असं म्हणत फडणवीसांनी चेंडू राष्ट्रवादीकडे टोलवला. अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काँग्रेससोबत जायचं नाही. हे तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मी पवारसाहेबांशी चर्चा केलेली आहे. आमच्या बहुतांश आमदारांचं मत असं आहे की, तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही. त्यामुळे आम्ही भाजपासोबत यायला तयार आहोत. आपण सरकार तयार करू आणि एक स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमच्या शपथविधीच्या दोन-तीन दिवसांपासूनच अजितदादांशी चर्चा सुरू झाली होती. काही गोष्टी पवारसाहेबांच्या स्तरावर होत होत्या. शपथविधी घेण्याच्या एक-दोन दिवस आधी अजितदादा आमच्याकडे आले होते. तीन पक्ष एकत्र सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, असं अजितदादा म्हणाले होते. त्यावेळी या तिन्ही पक्षांनी मिळून आम्हाला साइडलाइन केलं होतं. ज्या पक्षाला सर्वात मोठा जनादेश मिळालेला आहे, तो पक्ष पूर्णपणे बाजूला काढण्यात आला होता. अशा परिस्थितीत राजकारणामध्ये गनिमी कावासुद्धा खेळावा लागतो. तो आमचा गनिमी कावा फसला, पण हे करणं त्यावेळी गरजेचं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019