फडणवीस सरकारनं वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या केल्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 17:20 IST2018-06-11T17:20:24+5:302018-06-11T17:20:24+5:30
या बदल्यांमध्ये 8 वरिष्ठ अधिका-यांचा खांदेपालट करण्यात आला आहे.

फडणवीस सरकारनं वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या केल्या बदल्या
मुंबई- फडणवीस सरकारनं वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये 8 वरिष्ठ अधिका-यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. सतीश गवई यांची पर्यावरण विभागातून उद्योग विभागात बदली करण्यात आली आहे. सुनील पोरवाल हे गृह विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत.
आतापर्यंत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सुधीर श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिगीकर यांची बदली पर्यावरण विभागात करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांची बदली परिवहन विभागात करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले आहे. बांधकाम विभागात आशिषकुमार सिंह यांच्या जागी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.