फडणवीस तुमच्यासारखे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:23 IST2023-08-28T07:23:03+5:302023-08-28T07:23:21+5:30
तुमच्या अहंकाराचा निवडणुकीत पराभव होईल, अशी टीकाही बावकुळे यांनी केली.

फडणवीस तुमच्यासारखे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : अडीच वर्षे घरात बसून ज्यांनी कोरोनाकाळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले, गेल्या महिन्यात जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले ते देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत. फडणवीस जपानला तुमच्यासारखे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले नव्हते तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी गेले होते, असे प्रत्त्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दिले.
उद्धव ठाकरे तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नीतिभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच फडणवीसांवर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडीला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर
टीका करत आहात. तुमच्या अहंकाराचा निवडणुकीत पराभव होईल, अशी टीकाही बावकुळे यांनी केली.