शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने चालती ‘खासगी’ची वाट!

By admin | Updated: May 11, 2015 05:09 IST

सहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत सहकाराला घरघर लागलेली आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची पावले ‘खासगी’कडे वळली.

अमोल मचाले, पुणेसहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत सहकाराला घरघर लागलेली आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची पावले ‘खासगी’कडे वळली (की वळवण्यात आली?) आहेत.सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सहकार क्षेत्र समर्थपणे वाटचाल करीत असतानाच २१ व्या शतकाच्या प्रारंभापासून सहकाराच्या या पंढरीला स्वाहाकाराचा विळखा बसू लागला अन् खासगी कारखान्यांची संख्या वाढू लागली. प्रारंभी याची पकड फारशी जाणवली नसली तरी आता स्वाहाकाराच्या या विळख्याने सहकारी कारखान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल २८ सहकारी साखर कारखाने खासगीमध्ये परावर्तित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, साखर कारखान्यांच्या सहकारातून खासगीकरणाचा आकडा येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. १९५०-५१ मध्ये सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. खासगी कारखान्यांच्या पिळवणुकीमुळे त्रस्त असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांच्या रुपात जीवनदान मिळाले. ही सहकार चळवळ पुढे देशभरात फोफावली. या चळवळीतून अनेक नेते उदयास आले. काहींनी तर राष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केला. मात्र, सन २००० नंतर सहकारातील काही ‘वजनदार’ नेत्यांना स्वाहाकाराची लागण प्रमाणापेक्षा जास्त झाली आणि त्यातूनच सहकाराची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली. २००२ मध्ये सहकारी कारखान्यांची तारण मालमत्ता विकण्यासंदर्भातील सेक्रुटायझेशन अ‍ॅक्ट अस्तित्वात आल्यापासून या व्यवहारांना प्रारंभ झाला. ‘‘सहकारी कारखाने व्यवसायाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वदेखील पार पाडतात. बहुतांश खासगी कारखान्यांना सामाजिक उत्तरदायित्वासोबत काहीही देणेघेणे नसते. हे देखील खासगी कारखाने आर्थिकदृष्ट्या परवडण्यामागे एक कारण आहे,’’ असे पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने सांगितले. वर्षागणिक वाढताहेत खासगी कारखानदार १९५०-५१मध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला तेव्हा राज्यात १२ खासगी कारखाने होते. १९९०-९१मध्ये राज्यातील खासगी कारखान्यांची संख्या केवळ ८ होती. २०००-२००१ मध्ये ती १३ वर गेली. यानंतर खासगी कारखान्यांची संख्या सातत्याने वाढत गेली.२००७-०८मध्ये राज्यात सर्वाधिक १४५ सहकारी कारखाने होते. त्यानंतर ही संख्या कमी होत गेली.२०१३-१४ ते २०१४-१५ या काळात राज्यामध्ये एकूण २० कारखाने वाढले. यापैकी १७ कारखाने खासगी होते.