शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:33 IST

Lote MIDC News: इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे.

रत्नागिरी - इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आणि त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ही रसायने घातक असल्याने प्रदूषणाचे मोठे संकट भविष्यात लोटे आणि परिसरावर येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, भारतीय पर्यावरण यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

प्रदूषण निर्माण केल्यामुळे २०१८ मध्ये कंपनी बंदमिटेनी कंपनी इटलीतील विसेन्झा शहरात होती. भयंकर प्रदूषण निर्माण केल्यामुळे २०१८ मध्ये कंपनी बंद झाली. विसेन्झीच्या न्यायालयाने पर्यावरण प्रदूषण आणि इतर कारणांसाठी या कंपनीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवले.

या कंपनीची सर्व उपकरणे आणि त्यातील प्रक्रिया भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफ सायन्सेसने खरेदी केली आहे. लोटे येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने नुकतेच कायमचे रसायन बनवण्याचे उत्पादन सुरू केले आहे. 

सांडपाण्यात रसायन, जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषितइटलीतील मिटेनी कंपनीच्या सांडपाण्यामध्ये कायमचे रसायन (पीएफएएस) मोठ्या प्रमाणात आढळले. या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित झाले. हे पाणी पिणाऱ्या लोकांच्या रक्तात कायमचे रसायन मिसळले आणि त्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यात मिटेनीच्या कामगारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. 

ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीतपीएफएएस म्हणजे प्रति आणि पॉलिफ्लोरोआल्काइल पदार्थांचा मानवनिर्मित रसायनांचा मोठा गट. १९४० पासून विविध उत्पादने आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर सुरू झाला. त्याला कायमचे रसायन असे म्हणतात. ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीत. त्यामुळेच ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

आरोग्यावरील परिणामकायमचे रसायन हवेत आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहात असल्याने मूत्रपिंड व वृषण कर्करोगाचा धोका वाढतो. हार्मोनल समतोल बिघडून थायरॉईड, प्रजनन समस्या आणि मुलांची वाढ यावर परिणाम होऊ शकतो. यकृताच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. 

धोका आता उशाशीइटलीमधील उदाहरण समोर असतानाही जल आणि अन्य प्रदूषणांचा धोका असलेली ही रसायने बनवण्याचा कारखाना सध्या लोटे येथे सुरू असून, भविष्यात तो परिसरासाठी धोकादायक ठरू शकतो. भारतीय पर्यावरण विभागाकडून अशा उत्पादनांबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याची टीका पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार केली जाते. त्यानंतरही अशा उत्पादनाला परवानगी दिली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pollution-Causing Chemical Factory in Ratnagiri's Lote Industrial Area

Web Summary : A factory producing harmful chemicals, previously shut down in Italy for polluting water sources, has restarted in Lote, Ratnagiri. Environmental experts fear potential pollution risks, but Indian environmental agencies are seemingly overlooking the issue, raising concerns for the region's future.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण