शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, बोरिवली, पुणे रेल्वे स्थानकांत मिळणार विमानतळासारख्या सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 02:12 IST

आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : आगामी काळात नागपूर, पुणे, औरंगाबाद, बोरिवली आदी निवडक रेल्वे स्थानके विमानतळांप्रमाणे होणार आहेत. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे नसतील. सामानाच्या तपासणीसाठी प्रवाशांना रेल्वेगाडी यायच्या सुमारे तासभर आधी स्थानकावर यावे लागेल.रेल्वे स्थानकांत आग लागल्यास ते चार मिनिटांपेक्षा कमी वेळात रिकामे करण्यात येईल. इंडियन रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आयआरएसडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. के. लोहिया यांनी सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाचे विमानतळाप्रमाणे रुपडे पालटण्याचे काम येत्या पाच ते सहा महिन्यांत सुरू करण्याचा इरादा आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणुक एक महिन्यात करण्यात येईल. रेल्वे स्थानकांतील अशा बदलांसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या आराखड्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे.देशातील रेल्वे स्थानकांमध्ये विमानतळाप्रमाणे बदल करण्यात येतील त्या कामाला ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या मूळ कार्याव्यतिरिक्त जी अन्य कामे आहेत ती खाजगी कंपन्यांकडून करून घेतली जातील. त्यात सफाई, जाहिरात, दुकाने चालविणे, प्रसाधनगृहांची निगा, पार्किंग या कामांचा समावेश आहे. रेल्वेगाड्या चालविणे, सुरक्षा ही कामे रेल्वेकडूनच पार पाडली जातील. रेल्वे स्थानकांचे अशा प्रकारे रुपडे पालटण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अंधेरी, दादर, लोणावळा स्थानकांचाही समावेशअंधेरी, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल, लोणावळा, दादर, वर्धा, पुण्यानजिकचे शिवाजीनगर, अबू रोड आदी ४३ रेल्वे स्थानकांनाही विमानतळाप्रमाणे रुपडे व सोयी बहाल करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे