शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 16:58 IST

राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.

राजू इनामदार पुणे: राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे दोन वरिष्ठ निरीक्षक येत्या दोन दिवसांत मुंबईत दाखल होणार असून ते गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या मध्यंतरीच्या काही धक्कादायक पक्षांतराच्या घटनांची चौकशी करणार आहेत. पक्षाला क्षीण करणाऱ्या या गोष्टींबाबत राज्य संघटनेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील, बॅरिस्टर अंतूले यांचे पूत्र नावीद  यांनी जाहीरपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसºया पक्षात प्रवेश केला आहे. त्याशिवाय पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याबाबत सातत्याने घोळ घालण्यात येत आहे. गाडगीळ घराण्यातील आमदार अनंत गाडगीळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात. या सगळ्याच गोष्टींचा अर्थ काँग्रेस नेतृत्त्वाने महाराष्ट्रात पक्षामध्ये काही गडबड सुरू आहे असा लावला आहे. राज्याचे प्रभारी असलेले मल्लिकार्जून खर्गे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने नियुक्त केलेल्या सोनल पटेल यांच्याकडे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी याबाबत विचारणा केली असल्याची माहिती मिळाली.ही सगळीच घराणी काँग्रेसबरोबर कायम एकनिष्ठ राहिली आहेत. पक्ष अडचणीत असतानाही त्यांनी पक्षालाच साथ दिली. असे असताना आता त्यांचे वारस पक्ष का सोडत आहेत असा प्रश्न राहूल गांधी यांनी विचारला. राज्यातील पक्षाचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला, तरीही राधाकृष्ण विखे पदावर अजून कायम आहेत. ते मतदार संघात मुलासाठी म्हणून काँग्रेस तसेच भाजपाच्या नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेत आहेत, याचा अर्थ काय काढायचा अशी विचारणा राहूल यांनी करून प्रदेश शाखेच्या एकूणच कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली अशी माहिती पक्षातील सुत्रांनी दिली.याआधीही राहूल यांनी प्रदेश शाखेने शिफारस केलेल्या राज्यातील उमेदवार यादीतील काही नावांबाबत हरकत घेत, ही नावे स्थानिक पदाधिकाºयांबरोबर चर्चा करून निश्चित केलेली नाही असे स्पष्ट मत खर्गे यांच्याकडे व्यक्त केले होते. प्रदेशाध्यक्षांकडे विचारणा करा व नवी यादी पाठवण्यास सांगा असेही त्यांनी खर्गे यांना सुचवले होते. याही वेळी त्यांनी खर्गे यांच्याकडे राज्याचे प्रभारी पद तुमच्याकडे असताना तिथे पक्षातून असे आऊटगोईंग सतत का सुरू आहे असे विचारले. त्यानंतरच अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दोन निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एकदोन दिवसात हे निरीक्षक मुंबईत दाखल होती असे समजते. दरम्यान महासमिताने पक्षाचे राज्यातील निवडणूक निरिक्षक म्हणून मधूसुदन मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. त्यांनाही पक्षांतर प्रकरणाची माहिती घेण्याबाबत महासमिताने आदेश दिले असल्याचे समजते. लवकरच ते मुंबईत दाखल होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी