शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

नोटीस पाहून उघडले डोळे! 25 वर्षे संसारानंतर पत्नी, मुलीला सोडून गेलेल्या पतीला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 11:57 IST

तब्बल 25 वर्षे संसार केल्यानंतर 64 वर्षीय पतीच्या आयुष्यात दुसरी महिला आल्याने पतीने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. तसेच सर्व संपत्ती विकून त्याने दुस-या महिलेकडे

पुणे : तब्बल 25 वर्षे संसार केल्यानंतर 64 वर्षीय पतीच्या आयुष्यात दुसरी महिला आल्याने पतीने पत्नी आणि मुलीच्या जबाबदारीकडे पाठ फिरविली. तसेच सर्व संपत्ती विकून त्याने दुस-या महिलेकडे जाण्याची तयारी केली. मात्र, पती आणि वडिलांकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याने आई आणि मुलीने न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर पतीने न्यायालयात दुस-या महिलेला सोडून देण्याचे मान्य करत सर्व जबाबदारी स्वीकारण्याचे मान्य केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. घारगे यांच्या न्यायालयाने हा दावा निकाली काढला.महिला कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्याअंतर्गत न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने आणि तिच्या 23 वर्षीय मुलीने न्यायालयात दावा दाखल केला होता. संबंधित अर्जदार 57 वर्षीय महिलेचे आॅक्टोबर 1992 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी असून तिचे वय सध्या 23 वर्षे आहे. ही मुलगी इंजिनिअर झाली आहे. न्यायालयाने दोन महिन्यांच्या आत हा दावा निकाली काढला.संबंधित व्यक्तीची बहीण परदेशात राहत असून काही महिन्यांपासून त्याचे बहिणीच्या घरी जाणे वाढले होते. त्यातून बहिणीच्या घरी येणा-या एका महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. दुस-या महिलेबरोबर राहता यावे, म्हणून त्याने सर्व संपत्ती विकण्याची तयारी सुरू केली. घरखचार्साठी पैसे देणेही बंद करून त्याने पत्नी आणि मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो पत्नीला मारहाणही करू लागला.बहिणीच्या घरी गेलेला असताना त्याच्या मुलीने त्याला व्हिडीओ कॉल केला असता तो दुस-या एका महिलेबरोबर असल्याचे तिला दिसले. याबाबत तिने विचारणा केल्याने त्याने स्वत:च्या मुलीला धमकी देऊन तिला घराबाहेर काढले. त्यामुळे पत्नी आणि मुलीने आॅक्टोबर 2017 मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात अ‍ॅड. सुचित मुंदडा, अ‍ॅड. शीतल चरखा यांच्यामार्फत दावा दाखल केला.न्यायालयाकडून नोटीस आल्यानंतर त्याचे डोळे उघडले. त्याने तत्काळ तडजोडीबाबत बोलणी करून पत्नी आणि मुलीला मिळकतीमध्ये पूर्ण अधिकार देण्याचे, मोठी रक्कम कायमस्वरुपी ठेव म्हणून देण्याची तसेच दरमहा खर्चासाठी पैसे देण्याचे आणि परस्त्रीबरोबर कोणतेही नाते न ठेवण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे सर्व तडजोड करून पुन्हा एकत्र येण्याची त्याने तयारी दर्शविली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय