शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:13 IST

मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याकडेच रोख असल्याचं पाहायला मिळालं.

CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : "गुजरात पुढे आहे, असं विरोधकांनी सतत म्हणू नये. कारण महाराष्ट्र यापूर्वीही नंबर एक होता आणि यापुढेही नंबर एकच राहणार नाही.  सर्व बाबतींमध्ये आपण गुजरातसहीत सर्व राज्यांच्या पुढे आहोत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपण देशात नंबर एक आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात आज चौफेर फटकेबाजी केली. तसंच यावेळी फडणवीस यांनी राज्यात उघड झालेल्या खंडणीच्या प्रकरणांवरून अप्रत्यक्षरीत्या आक्रमक इशारा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. मात्र माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अपेक्षा एवढीच आहे की, खंडणीखोरांना पाठीशी घालू नका. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं जी घटना घडली त्यावर मी नंतर उत्तर देणारच आहे. पण अशा प्रकारे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर गुंतवणूक येणार नाही. जे सगळे वसूलीबाज आहेत, ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात. त्यामुळे माझ्या पक्षासहीत सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, आपण वसुलीबाजांना आसरा देण्याचं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुप्पटीने वाढेल. वसुली प्रकरणात जो असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या तक्रारीनंतर वाल्मिक कराड आणि अन्य काही आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याकडेच  असल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग इथं घडलेले सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणाशीच संबंधित पवनचक्की कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीबाबत आज  सविस्तर भाष्य करणं टाळलं असून ते उद्या सभागृहात याबाबत सरकारची भूमिका मांडण्याची शक्यता आहे. बीडमधील खंडणी प्रकरण नेमकं काय आहे?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह  तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे हे मागील एका वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे यांनी फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. त्यानंतर 'अरे, काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा,' असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हे कार्यालयात आले आणि पुन्हा धमकी दिली. 'काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू,' अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी कंपनीचेच शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा, असे सांगितले होते. काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली होती.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण