शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
3
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
4
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
5
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
6
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
7
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
8
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
9
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
10
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
11
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
13
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
14
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
15
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
16
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
17
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
18
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
19
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
20
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
Daily Top 2Weekly Top 5

Breaking ; सोलापूर विद्यापीठातील बहिस्थ विभाग झाला बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:40 IST

युजीसीच्या नव्या नियमांचा बसला फटका; सुमारे एक हजार विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचा प्रश्न

ठळक मुद्देबहिस्थ विभाग सुरु ठेवण्यासाठी युजीसीने नवे नियम लागू केले आहेतविद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची निर्मिती करावी असे नियम नव्याने लागू करण्यात आलेसोलापूर विद्यापीठाला बहिस्थ विभागाच्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पुस्तकांची निर्मिती करणे कठीण जाणार

सोलापूर : नोकरी करुन शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बहिस्थ अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे. युजीसीची (विद्यापीठ अनुदान आयोग) मान्यता घेण्याचे प्रलंबित असल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात किमान एक हजार विद्यार्थी हे विविध अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांपुढे आता प्रवेश घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बहिस्थ विभाग सुरु ठेवण्यासाठी युजीसीने नवे नियम लागू केले आहेत. याचा फटका विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाला बसला आहे. विद्यापीठाने बहिस्थ विभागासाठी स्वतंत्र मान्यता घ्यावी, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची निर्मिती करावी असे नियम नव्याने लागू करण्यात आले आहेत. सध्या सोलापूर विद्यापीठाला बहिस्थ विभागाच्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पुस्तकांची निर्मिती करणे कठीण जाणार आहे. तसेच बहिस्थ विभाग सुरु करण्यासाठी नॅकचे ३.२५ सीजीपीए मानांकन मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नॅकचे मानांकन २.६२ सीजीपीए इतके आहे. यामुळे विद्यापीठाला बहिस्थ विभाग सुरु ठेवता येणे शक्य नाही.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात प्रवेशित घेतला आहे. त्यांना त्यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी व अधिकचे दोन वर्षांत विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाकडून पदवी मिळवता येणार आहे. आधीच प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.   

बहिस्थ अभ्यासक्रम प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी काय करावे ?- अनेक विद्यार्थी हे काम करत शिकत असतात. त्यामुळे ते विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाच्या प्रवेशावर अवलंबून असतात. यंदा बहिस्थ विभाग बंद झाल्याने सुमारे एक हजार विद्यार्थ्यांसमोर आता पुढे काय असा प्रश्न आहे. सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तिथे हे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात; मात्र त्यांना आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच शहर व जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात चालविण्यात येणाºया अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी समाधानाची बाब म्हणजे मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी मुदत संपलेली असताना १६ आॅगस्टपर्यंत विलंब शुल्क देऊन प्रवेश घेता येणार आहे. यासोबतच शिवाजी विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात प्रवेश घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे आहे.

बहिस्थ विभाग सुरुच रहावा यासाठी युजीसीकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठ तुलनेने नवे असल्याने विशेष बाब म्हणून मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे; मात्र सध्या विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या बहिस्थ विभागातून प्रवेश देणे नियमात बसत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात बहिस्थ विभाग सुरु करणे व त्यासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.  - डॉ. श्रीकांत कोकरेसंचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालय