एक्स्प्रेस-वे जाम
By Admin | Updated: August 17, 2014 23:19 IST2014-08-16T22:24:46+5:302014-08-17T23:19:18+5:30
दिवसभर वाहतूक कोंडी; सलग सु्या आल्याने वाहनांची गर्दी

एक्स्प्रेस-वे जाम
खालापूर : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूककोंडीचा फटका दिवसभर प्रवाशांना बसला. सलग चार दिवस सुी आल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून हजारो वाहने मुंबईबाहेर पडल्याने पहाटेपासून एक्स्प्रेस-वे वाहनांनी जाम झाला होता.
स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिक कर्जत, खालापूर, पाली, लोणावळा, अलिबाग, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी एक्स्प्रेस-वेमार्गे वळल्याने हजारो वाहनांच्या गर्दीने एक्स्प्रेस-वेवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यातच खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. किमान ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या आणखीनच बिकट झाली होती .
बोरघाट ते खंडाळादरम्यान घाट सेक्शन भागात दिवसभर वाहतूककोंडी होती. पुण्याकडे जाणारी वाहतूक लोणावळ्यापर्यंत विस्कळीत झाली होती. सायंकाळनंतर अवजड वाहनांची गर्दी वाढल्याने घाटात वाहतूक धीम्यागतीने सुरू होती.