‘एक्स्प्रेस’ वाहतुकीला लागेल आता शिस्त, आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:49 AM2023-03-25T05:49:30+5:302023-03-25T05:49:53+5:30

अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनीही एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना येत असलेल्या अडचणी मांडत, प्रश्नाचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

'Express' traffic will now need discipline, ITMS system will be installed | ‘एक्स्प्रेस’ वाहतुकीला लागेल आता शिस्त, आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार

‘एक्स्प्रेस’ वाहतुकीला लागेल आता शिस्त, आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार

googlenewsNext

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही यंत्रणा येत्या काळात अधिक सक्षम केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जेणेकरून लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंक देखील पूर्ण होणार आहे तसेच आताही लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत आहे.  मोटार वाहनांचा दंड वसूल करण्यासाठीही सर्व वाहनचालकांच्या अद्ययावत मोबाइल क्रमांकाची माहिती करण्यात येईल.

अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनीही एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना येत असलेल्या अडचणी मांडत, प्रश्नाचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: 'Express' traffic will now need discipline, ITMS system will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.