शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात निर्यातबंदी, गुजरातचा कांदा परदेशात; २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 08:11 IST

या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यातीस परवानगी दिलेली नाही.

नारायण जाधव नवी मुंबई/नाशिक : देशभरात विशेषत: महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधून २००० मेट्रिक टन पांढरा   कांदा निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांत संताप  व्यक्त होत आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या न्हावा-शेवा अर्थात जेएनपीए बंदरातून गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे.

केंद्राने ८ डिसेंबर २०२३ पासून राज्यात कांद्याच्या निर्यातीस बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान होत आहे. यावरून नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.  राज्यातील  शेतकऱ्यांनी यावरून अनेकदा आंदोलनेही केली आहेत. अनेक ठिकाणी बाजार समित्याही बंद ठेवल्या होत्या. मात्र, या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यातीस परवानगी दिलेली नाही.

उन्हाळी कांदा देशभरातील बाजार समित्यांत कवडीमोल भावाने विकला जात आहे. असे असताना फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २५ एप्रिलला परवानगी दिली. यानुसार गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा एनसीएलच्या ऐवजी थेट निर्यातदारांच्या माध्यमातून निर्यातीस परवानगी दिली आहे.

केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या २५ टक्केही कांदा पिकत नाही. असे असताना तेथील निर्यातीस परवानगी अन् महाराष्ट्रात बंदी हे चुकीचे आहे. राज्यातही ५० टक्के कांदा निर्यातीस परवानगी द्यायला हवी.- महादेव राऊत, कांदा व्यापारी

गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात हा निर्णय गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा डाव असू शकतो. फक्त गुजरातच्याच पांढऱ्या कांद्याला परवानगी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.- निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष बळीराजा शेतकरी गट, नाशिक

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी