शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

देशातून ७० लाख टन साखर निर्यात करणार : केंद्राचे धोरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:19 IST

देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे.

ठळक मुद्देशिल्लक साखरेवर काढणार मार्ग देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येणार

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी देशात विक्रमी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशातून ६० ते ७० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला जाणार असून, त्यासाठी विशेष सवलत देखील देण्यात येणार असल्याची माहिती साखर महासंघाने दिली. यंदाच्या गाळप हंगामात ३३० लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही असेच उत्पादन झाले होते. देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास आहे. गतहंगाम आणि यंदाचा शिल्लकी साठाधरुन यंदा १ ऑक्टोबर २०१९ ला सुरु होणाऱ्या हंगामाच्या  सुरुवातीला १४५ लाख टनांचा साठा शिल्लकी असेल. त्यामुळे ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शानास आणून दिली. त्याची दाखल घेवून अन्न मंत्रालयाने सह सचिवांच्या (साखर) अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी बैठक आयोजित केली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या बैठकीत हंगाम २०१९-२० साठीच्या साखर निर्यातीचे धोरण व निर्यात योजनेवर चर्चा झाली. लवकरच २०१९-२० साठीची साखर निर्यात योजना करण्याचा निर्णय घेतला. त्यात ६० ते ७० लाख टन कच्ची व पांढरी साखर निर्यात करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी कारखाना अथवा राज्य निहाय साखर कोटा निश्चित करण्यात येईल, निर्यात दर व स्थानिक दर यातील तफावत दूर करण्यासाठी वित्तीय मदत देण्यात येईल. तसेच बँक स्तरावर निर्माण होणारा अपुरा दुरावा आणि त्यावर वेळीच उपायोजना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येईल. --निर्यातीला वातावरण अनुकुल

केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने काही आयातदार देशांना भेट दिली. यंदाच्या वर्षी जगातील दोन क्रमांकाचा व वार्षिक ४५ लाख टन साखर आयात करणाऱ्या इंडोनेशियाने भारतीय साखरेच्या आयात करात १५ टक्क्याहून ५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. भारतातून तयार होणाºया कच्च्या साखरेची खरेदी करण्याचे मान्य केली आहे. तसेच थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, युरोपात साखर निर्मिती कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे  जागतिक पातळीवर दोन वर्षानंतर प्रथमच साखरेचा तुटवडा जाणवेल. भारतातून निर्यात होणाऱ्या कच्च्या व पांढऱ्या साखरेची चांगली मागणी राहील. त्यासाठी साखर कारखान्यांनी नियोजनबद्धपणे पूर्वतयारीला लागावे असे, प्रकाश नाईकनवरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी