पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 20:53 IST2016-08-05T20:53:51+5:302016-08-05T20:53:51+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे पुलाखाली शुक्रवारी सापडल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने महामार्गावरील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली स्फोट
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ५ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे पुलाखाली शुक्रवारी सापडल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने महामार्गावरील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. मोठा आवाज व जाळ पाहून इतर कामगार धास्तावले. त्यांनी जखमीला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर सहापदरीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. रिलायन्सअंतर्गत आय.टी.डी. कंपनी ठेकेदार असून, त्या कंपनीने पोट ठेकेदार इतर कंपन्यांना नेमले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्याजवळच असलेल्या विरमाडे-उडतारे दरम्यानच्या पुलाचे बांधकामावर दोन-तीन प्लास्टिक व काचेच्या बरण्या आढळून आल्या. यावेळी कामगार अजय मेहता (वय ३७) हा बरणीचे झाकण काढण्यासाठी गेला असता बरणीतून भला मोठा आवाज होऊन ज्वाळा बाहेर पडल्या. यामध्ये संबंधित कामगाराचा हात भाजला. प्रसंगावधान राखत इतर कामगारांनी त्यास सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, सापडलेल्या बरण्यात गोल आकाराचे गोळे होते. त्यास निकामी करतानाच स्फोट होत असल्याने सर्वच कामगार घाबरले होते. ही स्फोटके कोणती व कशासाठी पुलाखाली ठेवली याचा तपास होणे गरजेचे आहे. भुर्इंज पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.