शोषखड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

By Admin | Updated: July 9, 2016 01:59 IST2016-07-09T01:59:09+5:302016-07-09T01:59:09+5:30

बोअरवेलच्या निकामी पाण्याकरिता बनविण्यात आलेल्या शोषखड्डयात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Explode death due to absorption | शोषखड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

शोषखड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : लोकसंख्येच्या आधारावर मुंबईतील प्रत्येक विभागात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा तपशील सादर करावा, तसेच आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी बृहद् आराखडा सादर करण्याचे आदेश मुंबई शहराचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संसर्गजन्य रोगांना अटकाव करण्यासाठी शासकीय आरोग्य सेवा संस्था व खासगी रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती’ची शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस स्थानिक आमदार, मुंबई शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसरकर आदी मंडळी उपस्थित होती.
या वेळी देसाई म्हणाले की, ‘मुंबई स्वच्छ राहील, याबाबत जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीने दक्ष राहायला हवे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्याला प्राथमिकता देत, त्यासाठी पाठपुरावा करावा. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर भरवावीत. त्यासाठी एक अभियानच राबविण्यात यावे. याद्वारे पावसाळ्यातील आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रबोधन, तसेच प्राथमिक उपचार केले जावे. स्वच्छता असेल, तरच आरोग्य चांगले राहील. यासाठी स्वच्छ मुंबई हे अभियानही राबविण्यात यावे. (प्रतिनिधी)

Web Title: Explode death due to absorption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.