सोशल मीडियावर अनुभवा वारी
By Admin | Updated: June 17, 2014 04:20 IST2014-06-17T03:46:20+5:302014-06-17T04:20:57+5:30
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्स अॅप, वेबसाइट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे.

सोशल मीडियावर अनुभवा वारी
राजेंद्र काळोखे, देहूगाव
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्स अॅप, वेबसाइट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे. अलौकिक परंपरेचा वारसा असलेली वारीदेखील काळानुरूप हायटेक झाल्याची अनुभूती भाविकांना मिळणार आहे.
वारकरी संप्रदायातील संस्कार परंपरांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर आषाढी वारीत करण्यात येणार आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशातील काही तरुण व ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेकरी वंशातील काही तरुणांनी प्रयत्न केलेला असून त्यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून कष्ट घेत आहेत.
यावर्षीदेखील फेसबुक दिंडी-वर्ष ४ थे अ श्ं१३४ं’ऊ्रल्ल्िर/" (ँ३३स्र://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ी५ील्ल३२/ 15349309367345220) या वर २०११ पासूनच्या पालखी सोहळ्याच्या विविध प्रसंगांचे चित्रीकरण, फोटो अपलोड केले आहेत. या वर्षी ३२९ व्या पालखी सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिका, विश्वस्त मंडळ महत्त्वाचे संपर्क क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे.