मुंबई आयुक्तालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ

By Admin | Updated: March 6, 2017 05:51 IST2017-03-06T05:51:50+5:302017-03-06T05:51:50+5:30

मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या विविध दर्जाच्या १७ हजार ४ पदांना ७ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली

Expansion of temporary posts in Mumbai Ayurvedic | मुंबई आयुक्तालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ

मुंबई आयुक्तालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ


मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या विविध दर्जाच्या १७ हजार ४ पदांना ७ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कामाच्या वाढत्या व्याप्तीमुळे आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यात आली असून ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या पदाचा निश्चित आकृतिबंध ३० एप्रिलपर्यंत उच्चस्तरीय समितीपुढे ठेवावा, अशी सूचना गृह विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Expansion of temporary posts in Mumbai Ayurvedic