कलादालन मोठे करावे - महापौर
By Admin | Updated: April 29, 2016 04:16 IST2016-04-29T04:16:30+5:302016-04-29T04:16:30+5:30
कलाकारांनीच कलादालन मोठे करावे, असे प्रतिपादन महापौर संजय मोरे यांनी केले.

कलादालन मोठे करावे - महापौर
ठाणे : ठाणे कलादालनाने कलाकारांच्या अंगभूत असलेल्या कलेला खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. म्हणून कलाकारांनीच कलादालन मोठे करावे, असे प्रतिपादन महापौर संजय मोरे यांनी केले.
ब्ल्यू एण्टरटेंण्टमेंटतर्फे माझे ठाणे कलामहोत्सवचा समारोप कलाभवन येथे उत्साहात झाला. यावेळी समारोपाचे अध्यक्ष म्हणून महापौर उपस्थित होते. ठाणे शहरातील सर्व कलाकारांची परिपूर्ण अशी डायरी बनवण्याची सूचना महापौरांनी करताच संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवळे यांनी हे काम आम्ही पुढील वर्षभरात पूर्ण करु , असे आश्वासन दिले. लघूचित्रपटात ‘पौष्ट डार्क’’ या लघूचित्रपटाला‘ उत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रथम तर ‘रोअर‘ यास दुसरा क्र मांक मिळाला. यावेळी घेतलेल्या लॅण्डस्केप स्पर्धेत बहुतांशी चित्रकारांनी ठाणे शहराचा कायापालट दाखविला. उड्डाणपूल व रस्तारुंदीकरण केल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा कसा असेल हे त्यांनी आपल्या चित्रात रेखाटले. तीन दिवसांत झालेल्या स्पर्धांसाठी कॅमेरामॅन राजा फडतरे, प्रा. विवेक टेटविलकर, कवी विनोद पितळे तसेच ज्येष्ठ चित्रकार शंकर देसाई, मिलींद क्षीरसागर, चेतन काजरेकर यांनी परिक्षक म्हणून काम केले. निशिगंधा आडारकर, विनय म्हात्रे , मुकेश चौधरी, श्रीनिवास माकम, प्रदीप घाडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)