शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 20:12 IST

राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला.

Maharashtra Lok Sabha Exit Poll Result ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज बहुतांश संस्थांनी वर्तवला आहे. मात्र देशात भाजपसाठी सकारात्मक वातावरण या एक्झिट पोल्समधून दिसत असलं तरी महाराष्ट्रात मात्र विरोधकांच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतल्याचं दिसत आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात शरद पवार हे पुतण्या अजित पवारांना चितपट करणार असल्याचा अंदाज टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीसह ते लढवत असलेल्या शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागेल. या एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांचा अंदाज वर्तवला असून अजित पवारांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष जिंकत असलेल्या सहा जागांमध्ये बारामतीसह शिरूर, सातारा, अहमदनगर दक्षिण या मतदारसंघांचाही समावेश असू शकतो.

एबीपी न्यूज-सी व्होटरचा एक्झिट पोल काय सांगतो? 

या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला १७, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही १ जागा कोणती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस - ८, शरद पवार यांची राष्ट्रवादी - ६ आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जागांवर जिंकू शकते. तसंच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी