पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 28, 2016 00:30 IST2016-07-28T00:30:44+5:302016-07-28T00:30:44+5:30

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. यामुळे माहेरकडील संतप्त मंडळींनी तिच्या पतीच्या दारासमोरच

Exhortation to husband in front of husband's house | पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार

पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार

बीड : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. यामुळे माहेरकडील संतप्त मंडळींनी तिच्या पतीच्या दारासमोरच या विवाहितेवर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.
बंडू शेषेराव गाडे यांची मुलगी छाया (२५) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी सिरसदेवी येथील लक्ष्मण कदम याच्याशी झाला होता. नंतर हुंड्यातील राहिलेले २५ हजार रुपये व एक तोळ्याची अंगठी घेऊन ये, अशी मागणी करीत तिचा छळ सुरू झाला. त्याला कंटाळून छायाने सोमवारी सकाळी विषप्राशन केले. दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
छायाचे वडील बंडू गाडे यांच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला. छायाचा मृतदेह घेऊन माहेरकडील मंडळींनी गाव गाठले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Exhortation to husband in front of husband's house