शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पठडीबाज पाठ्यक्रमांतून यंदापासून मुक्तता; महाविद्यालयांच्या स्वायत्तता प्रक्रियेला वेग

By रेश्मा शिवडेकर | Updated: January 1, 2024 13:56 IST

२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती.

मुंबई : अभ्यासक्रमांची निवड, परीक्षा पद्धती आदींबाबत उच्च शिक्षण संस्थांना स्वातंत्र्य देणाऱ्या स्वायत्तता धोरणाला आणखी वेग देण्याबरोबरच त्याचा विस्तारही केला जाणार आहे. आतापर्यंत पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांनाच स्वायत्तता बहाल करण्यात येत होती. परंतु, आगामी वर्षात पॉलिटेक्निक (पदविका) अभ्यासक्रम चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाही स्वायत्तता दिली जाणार आहे.

२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती. २०२३मध्ये हा आकडा ९७९ वर गेला असून, भविष्यात आणखी महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल केली जाणार असल्याची माहिती ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) आगामी वर्षातील योजनांचा आढावा घेताना दिली. महाराष्ट्रात २००९ साली मुंबई विद्यापीठातील एक, पुण्यातील चार, शिवाजी विद्यापीठातील दोन अशी काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी महाविद्यालये स्वायत्त होती. मात्र, आता महाराष्ट्रातील १५७ महाविद्यालये शैक्षणिक स्वायत्ततेची फळे चाखत आहेत. महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठातील सर्वाधिक ६१ महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. त्या खालोखाल पुण्यातील ३५ महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. कोल्हापूर विद्यापीठातील १७ आणि नागपूर विद्यापीठातील १५ महाविद्यालयांना स्वायत्तता मिळविण्यात यश आले आहे.

काही राज्यांतील स्वायत्त महाविद्यालयांची संख्याराज्य    २००९    २०२३महाराष्ट्र    १४    १५७आंध्र    ५७    १४१कर्नाटक    ३२    ९५मध्य प्रदेश    ३२    ४४ओरिसा    ३२    ५०तामिळनाडू    ११९    २५२तेलंगणा    -    १०५गुजरात    १    ८

शैक्षणिक स्वायत्ततेमुळे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीबाबत लवचिकता येत असल्याने आम्हाला औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रम राबविणे शक्य झाले आहे. आम्ही राबवत असलेले अनेक अभ्यासक्रम पारंपरिक विद्यापीठांत उपलब्ध नाहीत. या अभ्यासक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास मदत होते. त्यामुळे हे विद्यार्थी येत्या काळात उद्योगक्षेत्रात सामावून घेतले जातील.- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, होमी भाभा राज्य विद्यापीठ (एचबीएसयू)

 उपयोग काय? संलग्नित विद्यापीठाने आखून दिलेल्या चौकटीतच अभ्यासक्रम, परीक्षा घ्यावी लागते. स्वायत्त संस्थांना नवे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती ठरवता येते. रोजगारक्षम असे अभ्यासक्रम या संस्थांनी राबविणे अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकार