शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

By यदू जोशी | Updated: August 17, 2025 06:18 IST

राज्यात तब्बल अडीच हजार कोटींची अजूनही थकबाकी

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतुकीचे नियम मोडले म्हणून एकट्या मुंबईत विविध वाहनांवरील दंडाची रक्कम एक हजार कोटी रुपयांच्या घरात तर राज्यात अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात गेलेली असताना आता वाहनधारकांसाठी एकरकमी परतफेडीची अभय योजना आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

असा निर्णय झाला तर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या मालकांना या निर्णयाने दिलासा मिळणार असून राज्याच्या तिजोरीत एकमुस्त रक्कम जमा होऊ शकेल. मुंबईत २०२० पासूनची या दंडाची (ह-चालान) थकबाकीची रक्कम ही १,८१७ कोटी रुपये इतकी होती. त्यातील ८१७ कोटी रुपये वसूल करण्यात आले तरीही एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दंडाची रक्कम कितीही वाढली तरी तो न भरण्याचीच वाहन मालकांची प्रवृत्ती असते.

दंडाची रक्कम कमी करायची तर लोकअदालत हा एक मार्ग आहे. लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम जठलपास निम्मी करून दिलासा दिला जातो, असा अनुभव आहे. तरीही लोकअदालतीला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर एकरकमी परतफेडीचा पर्याय आता समोर आला आहे.

रिक्षा, दुचाकीला ७५% दंड होणार माफ?

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी परिवहन सचिवांकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओटीएस देताना १००% दंड वसूल करण्याऐवजी मोठी सूट दिली जाईल. ऑटोरिक्षा व दुचाकी वाहनधारकांनी २५ % रक्कम भरावी म्हणजे त्यांना ७५% दंड माफ केला जाईल, असाही प्रस्ताव आहे.

यापुढील काळात दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत वाहनधारक भरणार असतील तर त्यांना ५० टक्के दंड माफ करावा, असेही प्रस्तावित आहे. वाहनमालक जर दंडाची रक्कम भरणार नसतील तर ओटीएस देऊन किमान ५० ते ७५ टक्के रक्कम तरी वसूल करता येऊ शकेल, अशी कल्पना आता समोर आली आहे.

दुचाकी, तीनचाकी वाहने आणि स्वस्त कारसाठी अभय योजनेत दंडाची रक्कम ही महागड्या गाड्यांच्या तुलनेत कमी आकारली जाईल. लाखो वाहनांवर आज अडीच हजार कोटींहून अधिकचा दंड आहे. अभय योजनेद्वारे तो कमी करावा, त्याचवेळी सरकारला दंड आकारणीद्वारे एकाच वेळी मोठी रक्कम मिळेल, हाही त्यामागील उद्देश आहे.

एसओपी तयार करणार

वाहतुकीचा कोणता नियम मोडला तर किती दंड आकारावा हे परिवहन विभागाने निश्चित केलेले आहे. मात्र, अंमलबजावणीचे काम वाहतूक पोलिसांना दिले जाते. दंडाबाबत वाहतूक पोलिसांची मनमानी, नसलेले अधिकार वापरून वाहनचालकांना ते देत असलेला त्रास यातून संघर्ष होतो. यामुळे वाहतूक पोलिसांच्या अधिकारांत स्पष्टता यावी यासाठी एसओपी तयार करण्याचेही प्रस्तावित आहे, असे सूत्रांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम तोडल्याने आकारण्यात आलेला दंड हा सरसकट रह केला जाणार नाही, पण काही टक्के आकारणी करून इतर दंड माफ करावा, असे प्रस्तावित आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpratap sarnaikप्रताप सरनाईक