पुणे: राज्यातल्या भाजपा नेत्यांना वारंवार लक्ष्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. सध्या देशात नरेंद्र मोदींच्या तुलनेत कोणताही नेता नसल्याचे कौतुकोद्गार राऊत यांनी काढले. सध्याच्या घडीला मोदी हे देशातले सर्वाधिक लोकप्रिय नेते असून त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली असल्याचं राऊत यांनी म्हटलं. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपाला लक्ष्य करणाऱ्या संजय राऊत यांनी आजही भाजपाचा समाचार घेतला. मुख्यमंत्रिपदाच्या शब्दावरुन त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीका केली. 'अटलबिहारी वाजपेयी असल्यापासून माझं भाजपावर प्रेम आहे. नेते बदलतात, पिढी बदलते, तसे पक्षात हळूहळू बदल होत जातात,' असं म्हणत राऊत यांनी सध्याच्या भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं.शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर भाजपानं दिलेला शब्द पाळला असता, तर आज राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या सत्तास्थापनेत फारसं लक्ष घातलं असं वाटत नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. सध्या देशात मोदींइतका लोकप्रिय नेता नाही. त्यांनी जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान हा देशाचा असतो, तो कोणत्याही पक्षाचा नसतो, असंदेखील ते पुढे म्हणाले.
Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:45 IST