शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत अंधारावर उजेडाच्या विजयाची ‘धेंडाई’ उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:18 IST

अमरावतीपासून मोर्शी हे गाव ६० किमी अंतरावर आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सावंगा येथून ‘धेंडाई’ काढण्यास सुरुवात झाली.

अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी (जि. अमरावती) : सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असलेली ‘धेंडाई’ मोर्शी शहरात शनिवारी रात्री अमाप उत्साहात आणि शेकडोंच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर रात्री ‘धेंडाई’ काढली जाते. मोर्शी शहरातच नव्हे, तर अख्ख्या अमरावती जिल्ह्यात ‘धेंडाई’ची चर्चा होते.

अमरावतीपासून मोर्शी हे गाव ६० किमी अंतरावर आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सावंगा येथून ‘धेंडाई’ काढण्यास सुरुवात झाली. सृष्टीची निर्मिती ही अग्निदिव्यातून झाली आहे. अंधारावर विजय प्राप्त करण्यासाठी उजेडाची, प्रकाशाची गरज असते. प्रकाशाला लक्ष्मीचे रूपही मानले जाते. म्हणूनच दिवाळीच्या रात्री दिव्यांची आरास मांडून त्याची पूजा केली जाते. घरोघरी ही दिव्यांची धेंडाई फिरवून अंधारावर, अज्ञानावर, गरिबीवर मात व्हावी, अशी कामना केली जाते. पूर्वी ‘धेंडाई’ गावागावातून काढली जायची. कालांतराने बऱ्याच गावात ती बंद पडली. मात्र, मोर्शीकरांनी हा पारंपरिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे. मोर्शीमध्ये ‘धेंडाई’ची गाणी म्हणायला बुधवारपासूनच सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपर्यंत गाणी गायली गेली. काही दिवसांनंतर स्नेहभोजनाने ‘धेंडाई’ची समाप्ती होणार आहे.

अशी असते ‘धेंडाई’‘धेंडाई’ म्हणजे लाकडापासून बनविलेली कलाकृती. तिचा आकार एखाद्या पालखीप्रमाणे असतो. दोन माणसांना उचलता येईल, अशी समोर व मागे काठ्यांची व्यवस्था असते. ‘धेंडाई’मध्ये एकूण ८५ दिवे लावलेले असतात. ‘धेंडाई’सोबत परिसरातील शेकडो लोक फिरतात.

सगळी गाणी मुखोद्गतलोक रात्रभर पारंपरिक चालीत ‘धेंडाई’ची गाणी म्हणतात. गाण्यांमध्ये प्रामुख्याने गायीची स्तुतीसुमने असतात. तसेच कृष्णलीलेचाही समावेश असतो. ही गाणी कोठेही लिखित स्वरूपात संग्रहित केलेली नाहीत, तर चारशे वर्षांपासून शेकडो पिढ्यांनी ती मुखोद्गत करून ठेवली आहेत.