शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
3
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
4
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
5
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
6
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
7
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
8
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
9
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
10
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
11
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
12
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
13
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
14
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
15
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
16
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
17
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
18
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
19
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
20
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   

अशी ही अदलाबदली; राजकीय 'भूकंप' घडवणारं खातं वडेट्टीवारांकडून आता संजय राठोडांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 18:44 IST

संजय राठोड यांच्याकडचं खातं विजय वडेट्टीवारांकडे

मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खातेदेखील सोपवण्यात आले आहे. यापूर्वी ही दोन्ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेले भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खाते बदलास काल मान्यता दिली. आता विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यांचा पदभार आहे. तर संजय राठोड यांच्याकडे वने, भूकंप पुनर्वसन खात्यांची जबाबदारी आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र दुय्यम खाती देण्यात आल्यानं ते सुरुवातीला नाराज होते. त्यामुळेच त्यांनी खात्यांचा पदभारदेखील स्वीकारला नव्हता. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. यानंतर त्यांची नाराजी लक्षात घेऊन त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं देण्यात आलं. यानंतर वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारला. वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. याच भेटीत वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय घेण्यात आला. खातेवाटप जाहीर करताना एक चूक झाल्यानं काहीसा गोंधळ झाल्याचं त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं होतं. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं द्यायचं होतं, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असं लिहिलं गेलं, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSanjay Rathodसंजय राठोडcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात