शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

By अतुल कुलकर्णी | Published: May 05, 2024 8:07 AM

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे सेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दोघांमध्ये ‘इस हात लो उस हात दो’ असे नियोजन केले गेल्याची चर्चा आहे. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. या मतदारसंघातून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड २००४ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये येथून तेव्हाच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उभे आहेत. या मतदारसंघात धारावीचा मोठा भाग येतो. वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आपले वडील ज्या ठिकाणी पराभूत झाले त्याच मतदारसंघातून आपल्याला निवडून घ्यायचे आहे अशी त्यांची भावना होती. तर शिवसेना भवन या मतदारसंघात येते त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला हवा अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. 

धारावी पुनर्विकासाचा विषय गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. हे काम अदानी समूहाला मिळालेले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्यालय या मतदारसंघात आहे किंवा उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मुंबई उत्तरमध्ये आहे, या गोष्टीपेक्षाही धारावी पुनर्वसनाचा विषय दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळेच या मतदारसंघासाठी दोन्ही बाजूने हट्ट सुरू होता असे सांगितले जाते. पण शेवटी अनिल देसाई यांनाच मुंबई दक्षिण मध्यमधून उमेदवारी जाहीर झाली. 

मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उज्वल निकम आहेत. एमआयएमचे रमजान चौधरी यांनीही याच मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात ४,२७,१०० एवढे मुस्लिम मतदार आहेत. 

एमआयएमची उमेदवारी भाजप पुरस्कृत असल्याचे बोलले जात असले तरी, मुस्लिम मतदार यावेळी भाजपला मदत करणाऱ्यांसोबत जातील का? असा तर्क यासाठी दिला जात आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये  ५,६७,१०० इतके सर्व समाजाचे मराठी मतदार आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मतदान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करेन. हाताचे बटण दाबेन, असे जाहीरपणे सांगितले होते. 

गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड या दोन मतदारसंघांसाठी नियोजन सुरू आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसैनिकांनी वर्षा गायकवाड यांचे काम करावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांची माणसे कामाला लावली आहेत. माजी मंत्री अनिल परबही वर्षा गायकवाड यांच्यासाठी काम करत आहेत. ठाकरे यांनी आपल्या विश्वासातील काही लोकांना वर्षा गायकवाड यांच्यासाठी कार्यालय स्थापन करण्यापासून अनेक गोष्टींची जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी कलिनामधून संजय पोतनीस यांना कामाला लावले आहे. ते तिथले आमदारही आहेत. याच पद्धतीने धारावीमधून उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी वर्षा गायकवाड यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. या दोघांमधील ही देवाणघेवाण व्यवस्थित पार पडली, तर मतांचे गणित सोपे जाईल असे दोन्ही बाजूंचे म्हणणे आहे.

 मुंबई दक्षिण मध्यमधील विद्यमान आमदार  नवाब मलिक, अणुशक्ती नगर (अजित पवार गट)   प्रकाश पातरपेकर, चेंबूर (उद्धवसेना)   वर्षा गायकवाड, धारावी (काँग्रेस)   कॅप्टन आर तमिल सेलवन, सायन कोळीवाडा (भाजप)  कालिदास कोळंबकर, वडाळा (भाजप)   सदा सरवणकर, माहीम (शिंदेसेना)

 मुंबई उत्तर मध्यमधील  विद्यमान आमदार  पराग अळवणी, विलेपार्ले (भाजप)  दिलीप लांडे, चांदीवली (शिंदेसेना)  मंगेश कुडाळकर, कुर्ला (शिंदेसेना)  संजय पोतनीस, कलीना (उद्धवसेना)  झिशान सिद्दिकी, बांद्रा, पूर्व (अजित पवार गट) आशिष शेलार, बांद्रा, प. (भाजप)

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडAnil Desaiअनिल देसाईmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्यmumbai-north-central-pcमुंबई उत्तर मध्य