माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

By Admin | Updated: April 29, 2016 04:30 IST2016-04-29T04:30:46+5:302016-04-29T04:30:46+5:30

माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना या पुढे पालिकेचा मालमत्ता कर पूर्ण माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Ex-servicemen forgive property taxes | माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

बदलापूर : बदलापूर पालिका हद्दीतील माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना या पुढे पालिकेचा मालमत्ता कर पूर्ण माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शहरातील सर्व माजी सैनिकांची माहिती संकलित करुन ही करमाफी देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
बदलापूर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी नगराध्यक्ष म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी सैनिक त्याचप्रमाणे शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना पालिकेने मालमत्ताकरात पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेतला. त्यांची पालिका हद्दीत कोणतीही मालमत्ता असो त्याला करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सैन्यात शौर्यपदक मिळविलेल्या सैनिकांनाही कर माफ करण्यात आला आहे.
अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरही चर्चा झाली. बड्या व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही असा सवाल नगरसेविका राजश्री घोरपडे यांनी विचारला. यावर बांधकाम सभापती सुनील भगर यांनीही पालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत मोठ्या व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही कारवाईची मागणी उचलून धरली. त्यावर नगराध्यक्ष म्हात्रे यांनी ५ मे रोजी अतिक्रमणांविरोधात मोठ्या कारवाईचे आणि त्याचे नेतृत्व स्वत: करणार असल्याचे जाहीर केले.
>नगररचना विभागच जबाबदार
कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अनेक अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दिलेल्या मंजुरीपेक्षा जास्त मजले उभारले आहेत. अनेकांनी तळमजल्यावरच अनधिकृत फ्लॅट काढले आहेत. या सर्व बाबींची चाचपणी न करताच त्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखलाही देण्यात येतो. त्यामुळे यापुढे इमारतीच्या अनधिकृत बांधकामास नगररचना विभागच जबाबदार राहिल असे आदेश नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दिले.

Web Title: Ex-servicemen forgive property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.