शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा, अकोट न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 1:45 AM

अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते.

अकोट : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव रामराव गावंडे यांना अकोटच्या न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत तीन महिन्यांचा कारावास तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यास इजा पोहोचविल्याप्रकरणी एक महिन्याचा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील दुसरे आरोपी तत्कालीन आमदार गजानन दाळू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते. त्यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते. घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोज पृथ्वीराजसिंह बैस यांना बोलावले होते. तेथे पोहोचल्यानंतर गावंडे यांनी आपल्याबरोबर वाद घातला. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करीत पेटवून देण्याची धमकी दिली. याचवेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने आपल्या अंगावर कॅनमधील रासायनिक द्रव्य फेकले, अशी फिर्याद बैस यांनी दिली होती. पाकळ हे मला वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही बैस यांनी फिर्यादीत म्हटले होते. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला.आंदोलन जनहितासाठीबळेगाव फाट्यावर सुरू असलेल्या रस्ता कामामुळे जनता त्रस्त झाली होती. त्या मार्गावरून जाताना ३१ मे २०१३ रोजी तिथे गर्दी जमलेली दिसली. त्यावेळी थांबलो तर लोकांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून थांबविले होते, हे लक्षात आले. यावेळी घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा चांगलाच वाद झाला. मी न्यायालयाचा आदरच करतो, निकालाचा पूर्ण सन्मान ठेवून मी सांगू इच्छितो की, ते जनआंदोलन होते. सामान्यांसाठी मी मागे हटणारा नाही; पण जनआंदोलनाबाबत असा निर्णय येत असेल, तर वरच्या न्यायालयात अपील केले जाईल.

टॅग्स :Courtन्यायालय