सर्वांना आपली वाटेल अशी असेल ‘मेट्रो’

By Admin | Updated: January 1, 2015 01:29 IST2015-01-01T01:29:01+5:302015-01-01T01:29:01+5:30

नागपूरमध्ये पुढच्या काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मात्र प्रत्येक नागपूरकरांना आपली वाटेल अशी ती असेल व ज्यामुळे नागपूरच्या

Everyone will feel like 'Metro' | सर्वांना आपली वाटेल अशी असेल ‘मेट्रो’

सर्वांना आपली वाटेल अशी असेल ‘मेट्रो’

व्यवस्थापकीय संचालकांचे स्वप्न : अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू
नागपूर: नागपूरमध्ये पुढच्या काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मात्र प्रत्येक नागपूरकरांना आपली वाटेल अशी ती असेल व ज्यामुळे नागपूरच्या रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण कमी अशा पद्धतीने हा प्रकल्प राबवू, असा विश्वास मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.
दीक्षित मंगळवारपासून नागपूरमध्ये आहेत. विविध अधिकारी, तंत्रज्ञ यांची भेट घेऊन ते ‘मेट्रो रेल्वे’प्रकल्पाविषयी चर्चा करीत आहे. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बुधवारी संवाद साधला व या प्रकल्पाबाबत चर्चा केली. अतिशय व्यस्त असतानाही दीक्षित यांनी मेट्रोबाबत त्यांची संकल्पना मांडली. मेट्रो कशी असेल असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले की, सर्वांना आपली वाटेल अशी मेट्रो असेल.
विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एवढेच नव्हे तर ज्याच्याकडे वाहने आहेत त्यांना व ज्यांच्याकडे ते नाहीत अशा सर्व नागपूरकरांना या प्रकल्पाचा लाभ होईल त्यामुळे सर्वांना नागपूरची मेट्रो ही आपली वाटेल, ‘माझी मेट्रो’ असे म्हणत नागपूरकर यावर गर्व करतील , अशा पद्धतीने या प्रकल्पाचा विकास करण्याचे प्रयत्न राहील.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे उणेपण यामुळे खासगी वाहनांची संख्या प्रत्येक मोठ्या शहरात वाढली आहे. त्यातून अपघात तर वाढलेच. पण प्रदूषणाची समस्याही निर्माण झाली. याबाबी टाळायच्या असतील तर सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हाच त्यावर पर्याय आहे. नागपूरमध्ये मेट्रो रेल्वे हा त्यावर उपाय असेल.
वाहनांची संख्या कमी होईल, त्यामुळे रस्त्यावरील गर्दी ओसरेल आणि अपघातही कमी होईल. प्रदूषण कमी होईल. सर्वांना सोयीची ठरेल अशाच पद्धतीने हा प्रकल्प राबविण्याचे स्वप्न आहे. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उदिष्ट सरकारने दिले आहेत. त्यामुळे सरकारकडून सहकार्य मिळेलच. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
भूसंपादनाची अडचण येणार नाही
मोठ्या प्रकल्पांमध्ये सर्वसाधारणपणे भूसंपादनाची अडचण येते. मेट्रोसाठी तर शहरातील प्रमुख वस्त्यांमधील जमीन संपादन करण्याचे आव्हान आहे, याकडे दीक्षित यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या प्रकल्पात भूसंपादन हा अडथळा येणार नाही. त्यादृष्टीने मी याकडे पाहात नाही.

Web Title: Everyone will feel like 'Metro'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.