शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ५ लाख लिटर सांडपाणी होणार शुद्ध, पुण्यात साकारला पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:24 IST

परदेशात सांडपाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात असताना आपल्याकडे मात्र त्याबाबत उदासीनता दिसून येते.

पुणे : परदेशात सांडपाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात असताना आपल्याकडे मात्र त्याबाबत उदासीनता दिसून येते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यानात साकारण्यात आला आहे. दररोज ५ लाख लिटर सांडपाणी शुद्ध करून ते उद्याने, स्वच्छतागृहे व नवीन बांधकामांसाठी वापरले जाणार आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची निकड मोठ्या प्रमाणात भासण्यास सुरूवात झाल्यानंतर यंत्रणांना जाग येऊन पाणी बचतीचे संदेश नागरिकांना दिले जातात. मात्र पाणी टंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी फारसे प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत. यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा पहिला प्रकल्प सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यानात उभारण्यात आला असल्याची माहिती माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागूल यांनी दिली.आबा बागूल यांनी सांगितले, प्रभागातील सांडपाणी एकत्र करून ते प्रकल्पाच्या ठिकाणी आणले जाणार आहे. या ठिकाणी या पाण्याचा रंग, दुर्गंधी, वास व जंतू नष्ट करून ते पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे. सांडपाणी बायो मीडिया फिल्टर बेडवर सोडून शुद्ध केले जाणार आहे. यामध्ये रसायनांचा कोणताही वापर केला जाणार नाही. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात दररोज ५ लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया होणार आहे. दुस-या टप्प्यात ही क्षमता १० लाख लिटरपर्यंत वाढविली जाणार आहे.ग्रे वॉटर प्रकल्प उभा करण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता, अखेर त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकल्पासाठी दिड हजार इमारतींमधील अंघोळ व स्वयंपाकाचे पाणी एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी अडीच किमीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे असे बागूल यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी १ कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. पाण्याच्या पुनर्वापराला चालना देणा-या अशा प्रकल्पांची व्याप्ती वाढविणे पुढील काळात राबविणे आवश्यक असणार आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे