शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:08 IST

"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..."

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत जीआर काढल्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले. यासंदर्भात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

यावेळी, काल जरांगे पाटलांची इच्छा होती की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्यांनी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी व्यासपीठावर यावे, पण त्यावेळी ती मान्य झाली नाही, कारण प्रत्येक नेता वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले? असे एका पत्रकाराने विचारले असता, राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानितला हा अतिशय गंभीर प्रश्न होता. अशा वेळेला सर्वांनी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राहणे आवश्यक होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मुंबई संदर्भातील काही प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्र ठेवण्यासाठी, कधीही भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणे आवश्यक होते." 

राऊत पुढे म्हणाले, "स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीत गुंतलेले होते. हे मला माहीत आहे. की, कशा प्रकारे यातून मर्ग काढायचा? हाय कोर्टाच्या निर्णयानंतर आपण कशा प्रकारची पावले टाकायला हवीत? किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलांकडे जायला हवे? यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते. म्हणजे, अगदी मी त्यांचा टीकारार असतो, तरी हे मी सांगू शकतो की, कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. यासंदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांबद्दल अपशब्द वापरले, त्यांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे." 

याच वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, "एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता? की हे प्रकरण आणखी चिघळत रहावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत यावेत, अशी काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षाने जानवले, असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा