मनोरूग्णाच्या आईवडिलांकडूनही पोटगी
By Admin | Updated: August 7, 2014 01:26 IST2014-08-07T01:26:49+5:302014-08-07T01:26:49+5:30
मुलगा मनोरूग्ण असतानाही, त्याचे लगA लावून दिले. त्यामुळे त्याच्या लगAाची जबाबदारी ही मुलाच्या आईवडिलांची आहे,

मनोरूग्णाच्या आईवडिलांकडूनही पोटगी
>पुणो : मुलगा मनोरूग्ण असतानाही, त्याचे लगA लावून दिले. त्यामुळे त्याच्या लगAाची जबाबदारी ही मुलाच्या आईवडिलांची आहे, असे निकालात नमूद करत न्यायालयाने मुलासह आईवडिलांनी विवाहितेला दरमहा 3 हजार रूपये पोटगी द्यावा, असा आदेश दिला आहे.
सोलापूरची 28 वर्षीय संगीता व पुण्यातील 3क् वर्षीय राजेश (दोन्ही नावे बदललेली)यांचा फेब्रुवारी 2क्13 मध्ये विवाह झाला होता. लगAाच्या वेळेस संगीताला राजेश हा मनोरूग्ण असल्याची कल्पना होती. या लगAात राजेशच्या पालकांनी रितीरिवाजानुसार लगA लावून दिले होते. लग्नानंतर दोन महिने संगीता राजेशच्या कुटुंबियांसोबत राहिली. त्यानंतर ती आपल्या माहेरी गेली. तिच्या म्हणण्यानुसार पतीने तिच्यासोबत माहेरी राहायला यावे अशी इच्छा होती मात्र राजेश गेला नाही. यानंतर तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली राजेश हा वैवाहिक सुख देण्यास शाररिकदृटय़ा असमर्थ असल्याने पोटगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. यामध्ये 1क् हजार रूपये पोटगी व मानसिक व भावनिक आघातासाठी 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई मिळावी असा अर्ज केला.
यावर राजेशच्यावतीने अॅड. भारती जागडे यांनी राजेशला मनोरूग्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय लगAानंतर दोघे हनिमूनसाठी गेले व तेथे दोघांमध्ये शाररिक संबंध प्रस्थापित झाल्याचे संगीताच्या उलटतपासणीत सिद्ध केले. कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण हा कायदा महिलांना संरक्षण देण्यासाठी आलेला आहे. मात्र संगीताने छळ झाल्याबाबतचा सबळ पुरावा सादर केलेला नाही. याउलट राजेश मनोरूग्ण असल्याचे ठाऊक असतानाही हा अर्ज करून त्याला त्रस देण्यात आल्याचे सिद्ध केले.
न्यायालयाने नमूद केले की, राजेश मनोरूग्ण असल्याचे माहीत असतानाही लगA करण्यास होकार दिल्यानेच सासरच्या लोकांनी लगAाचा खर्च केला. मनोरूग्ण व शाररिकदृष्टया समर्थ असल्याचे पुरावे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलासह आईवडिलांनी 3 हजार रूपये पोटगी द्यावी. तसेच कलम 2क् नुसार शाररिक मानसिक छळाची नुकसान भरपाई 5 लाखाची मागणी केली आहे. मात्र कौटुंबिक त्रसाबाबत कायद्याअंतर्गत या प्रकरणाचा विचार केला असता हे प्रकरण पती- प}ीच्या नातेसंबंधांबाबत आहे. यामध्ये व्यावहारिकता आणता येणार नाही. असे न्यायालयाने नमुद केले.