विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा सोन्याचे भाव एक लाखाच्या पुढे गेले तरी सोने खरेदीचा उत्साह कायम असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्रतिसाद वाढून जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन एक लाख १८ रुपयांवर आले तर चांदी भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ४७ हजार रुपयांवर पोहचली.
नवरात्रोत्सवापासून सोने-चांदी खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोने चांदीचे भाव एक लाखाच्या पुढे गेले असले तरी ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजयादशमीला उलाढालीत भर पडली. स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.
विजयादशमीला चार वर्षात ७० हजारांनी वधारले सोनेचार वर्षातील विजयादशमीच्या दिवसाची सोने-चांदीचे भाव पाहिले तर या चार वर्षीत सोने ७० हजार ५० रुपयांनी वधारले. चांदीही ८५ हजार ३०० रुपयांनी वधारली आहे.
वर्ष सोने चांदी२०२१ ४७,९५० ६२,२००२०२२ ५२,६०० ६२,०००२०२३ ६१,३०० ७३,५००२०२४ ७६,६०० ९३,०००२०२५ १,१८,००० १,४७,५००
Web Summary : Despite gold rates crossing ₹1 lakh, Dussehra spurred significant buying in Jalgaon. Estimated turnover reached ₹20-25 crore. Gold decreased to ₹1,00,018, while silver rose to ₹1,47,500. Gold prices have increased by ₹70,050 in four years.
Web Summary : सोने की दरें ₹1 लाख पार करने के बावजूद, दशहरा ने जलगाँव में महत्वपूर्ण खरीदारी को बढ़ावा दिया। अनुमानित कारोबार ₹20-25 करोड़ तक पहुंचा। सोना घटकर ₹1,00,018 पर आ गया, जबकि चांदी बढ़कर ₹1,47,500 हो गई। चार वर्षों में सोने की कीमतों में ₹70,050 की वृद्धि हुई है।