शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:34 IST

सर्व पक्षांनी औकात वाढवावी, संघटनात्मक काम करावे, आपोआपच जागा मिळतील - जानकरांचा राजकीय पक्षांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी (जि. पुणे) : लोकसभेनंतरही महायुती टिकून राहणार आहे. विधानसभेला ज्याची जिथे ताकद आहे, तसेच जागा वाटप होईल. त्यामुळे घटक पक्षांसह सर्व पक्षांनी भाजपसारखे संघटनात्मक काम करावे, आपोआपच जागा मिळतील. आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे नाही. मेलो तरी चालेल, पण धनुष्य-बाण, हात आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला, त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार आहे, असे मत माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केले. 

मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘अभिमान गहाण टाकणार नाही’ भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक न लढविल्याचा फटका बसणार नाही का?, या प्रश्नावर जानकर म्हणाले, स्वतःच्या पक्षाचा मला अभिमान आहे. कमळ चिन्हाची ऑफर होती. परंतु, दुसऱ्या पक्षाच्या महालापेक्षा माझी झोपडीच बरी आहे. काहीही झाले, तरी पक्षाचा अभिमान गहाण टाकणार नाही. २०१४ ला बारामती शहराने माझ्यावर आणखी जरा प्रेम केले असते, तर पवारांना मी हरवले असते. त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलेही नव्हते.   

‘महायुतीत बेबनाव नाही’ nजानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढत असून, महायुतीत कोणताही बेबनाव नाही. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. विकास करण्यासाठी तिजोरीच्या चाव्या हाती पाहिजेत. nविरोधकांना पराभव दिसत असल्याने पैसे वाटपाचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. कोणी रडलं, तरी बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पाच हजारांनी का होईना निवडून येतील.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४