शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"फडणवीसांनी मारून टाकलं तरी ते आमदार बोलू शकत नाही", मनोज जरांगेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:15 IST

Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले.  

Manoj Jarange Latest News : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का?, असा सवाल दरेकरांनी केला. याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी भाजपमधील मराठा आमदारांना इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही जरांगेंनी लक्ष्य केले. 

"हा देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप" मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. त्याला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, "हा देवेंद्र फडणवीसांनी रचलेला ट्रॅप आहे. मोठे लोक जे बोलताहेत ना, त्यांना गरीब मराठा मोठा होऊ वाटत नाही. सगळ्या संघटना फोडल्या. काही समन्वयक फोडले. भाजपतील काही मराठा आमदार बोलायला लागले. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असाच भाजपमधील मराठा आमदार बोलायला लागला आहे."

"त्यांना त्यांची पोरं मोठी करायची आहेत. त्याला मालमत्ता कमावायची आहे. त्याला पक्ष मोठा करायचा आहे आणि नेता मोठा करायचा आहे, तेच आमदार आमच्या विरोधात बोलत आहेत. भाजपमधील काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मारून टाकलं तरी बोलू शकत नाही. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही", असे जरांगे म्हणाले.

"वेळ येऊ द्या, तुम्हाला...", मनोज जरांगेंनी काय दिला इशारा? "अनेक आमदार मला भेटून गेले. त्यांनी सांगितलं की, समाजाचं कल्याण होत आहे. आमच्यावर दबाव असला तरी आम्ही बोलणार नाही. कारण गरिबाची लेकरं मोठी व्हायला लागली आहेत. ज्यांना स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची आहे. नेता, पक्ष सांभाळायचा आहे. जात मेली तरी चालेल, असेच लोक फक्त बोलत आहेत. आंदोलनाच्या विरोधात मराठा समाज उभा राहणार नाही. वेळ येऊद्या मराठे तुम्हाला कसे सरळ करतात, बघा", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्या आमदारांना दिला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा