शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 05:25 IST

आमचेच सरकार येणार, महायुती व मविआ दोघांनाही ठाम विश्वास; आणखी २ एक्झिट पोलचा कौल महायुतीच्या बाजूने

दीपक भातुसे, मुंबई Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महायुतीमहाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबतच्या शक्यतांची चाचपणी करण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. तर, सत्ता स्थापनेसाठी गरज पडली तर निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांशी महायुतीकडून संपर्क केला जात आहे.

निवडणुकीत मविआला स्पष्ट बहुमत मिळाले तर कशा पद्धतीने पुढे जायचे, या पर्यायासह स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि बंडखोर तसेच अपक्षांची गरज लागणार असेल तर काय पावले उचलायची याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर उद्धवसेनेकडून खासदार संजय राऊत व अनिल देसाई उपस्थित होते. 

मविआच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची आणि नंतर सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. मविआचे सरकार आले तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील. त्यामुळे या भेटींना महत्त्व आहे.

संख्याबळाची जबाबदारी कुणाला यावरही खल

राज्यातील २८८ मतदारसंघाचा निकाल काय असेल, याबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मविआच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार कोणता बंडखोर आणि अपक्ष निवडून येऊ शकतो, सत्ता स्थापनेसाठी त्यांची गरज लागली तर त्यांच्याशी कोणत्या पक्षाने आणि कोणत्या नेत्याने संपर्क करावा, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एक्झिट पोलचे आकडे महायुतीला बहुमत दाखवत असले तरी मविआच्या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय निकालाच्या घेतलेल्या आढाव्यानुसार मविआचे सरकार येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला. 

महायुतीकडून संपर्क सुरू : महायुतीकडूनही सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरू झाली आहे. काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीला काठावरचे बहुमत मिळेल असा अंदाज आहे. अशा वेळी अपक्ष आपल्याबरोबर रहावेत यासाठी निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्षांशी महायुतीच्या नेत्यांनी संपर्क करणे सुरू केल्याचे समजते.

आणखी २ एक्झिट पोलचा कौल महायुतीच्या बाजूने

मुंबई : विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कौल दिला असतानाच गुरूवारी आलेल्या दोन एक्झिट पोलनेही राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे.

मतदानाच्या दिवशी सात संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलपैकी पाच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे बहुमताने सरकार येईल, असा अंदाज वर्तवला होता. गुरूवारी ॲक्सिस माय इंडिया आणि टुडे चाणक्य या दोन संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दाखवले असून, मविआतील तीन पक्ष मिळून १०० च्या आसपास जागा मिळवतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

संस्था - महायुती - मविआ - इतर

ॲक्सिस माय इंडिया - १७८ ते २०० - ८२ ते १०२ - ६ ते १२

टुडे चाणक्य - १७५ - १०० - १३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग