शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचे मूल्यमापण, उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाळे राज्यात प्रथम
By सदानंद नाईक | Updated: May 9, 2025 17:20 IST2025-05-09T17:17:22+5:302025-05-09T17:20:21+5:30
Maharashtra: शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापणात महापालिका आयुक्त मनिष आव्हाडे राज्यात सर्वोत्तम ठरल्या

शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचे मूल्यमापण, उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाळे राज्यात प्रथम
शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापणात महापालिका आयुक्त मनिष आव्हाडे राज्यात सर्वोत्तम ठरल्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिला आहे.
उल्हासनगर महापालिका कारभारा बाबत नकारात्मक दुष्टिकोनातून बघितले जाते. दरम्यान शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयीन मूल्यमापनात महापालिकेचे आयुक्त आव्हाळे राज्यात सर्वोत्तम ठरल्याने, आव्हाळे यांच्या कामाची चर्चा सुरु झाली. स्मार्ट चौक, रस्ते, शाळा, पार्किंग, लेखा विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, परिवहन विभाग आदींच्या विभागाला कॉर्पोरेट लुक दिला. महापालिकेतील सर्व विभागाचे संगणकीकरण झाले. त्यामुळे फाईल दिसत नसल्याच्या किंबहूना गहाळ झाल्याच्या प्रकाराला पूर्णविराम मिळाला. एकूणच महापालिका कारभाराबाबत उत्सुकता निर्माण झाली.
महाराष्ट्रातील २९ महापालिकेतून उल्हासनगर महापालिका सर्वोत्तम ठरल्या निमित्त मंत्रालयातील विधिमंडळ सभागृहात आयुक्त मनिषा आव्हाळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. शहराला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला असून विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिले. गुरुवारी आयुक्तानी शहरातील चौक, रस्ते आदीची पाहणी करून खड्डेमय रस्त्याच्या दुरस्तीचे आदेश दिले. आयुक्तांच्या पारदर्शक कामामुळे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहे. तसेच अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारानाही नोटीस दिली.