शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:36 IST

राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : उत्पादनात १५ ते २० टनांनी होणार घटदेशात यंदा ३०० लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज

पुणे : मराठवाडा, खानदेशासह विविध ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने ९० लाख टन साखर उत्पादन होईल, असे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.  राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या (२०१८-१९) हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १०६ ते १०७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा उसाचे प्रमाण ६० टक्के असल्याने सरासरी ९० टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला.  तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६० लाख हेक्टरने अधिक आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन वाढेल असा अंदाज आॅगस्ट महिन्यात सहकार मंत्र्यांनी वर्तविला होता. शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने उसासह विविध पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याचा अंदाज आहे. याबाबत माहिती देताना वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने मराठवाडा, खानदेश, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. या भागात एकूण उसाच्या ४० टक्के क्षेत्र आहे. अत्यल्प पावसामुळे येथील उत्पादनात ४० टक्के घट होईल. त्यातच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकतेत १० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सरासरी १५ ते २० टक्के उत्पादनात घट होईल. त्यामुळे यंदा साडेसातशे ते आठशे लाख टन ऊस गाळपातून ९० ते ९२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. ..........................देशात ३०० लाख टन साखर उत्पादित होणार?उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या २३८ या जातीवर रोग पडल्याने येथील साखर उत्पादन १२० लाख टन अंदाजापेक्षा ११० लाख टनापर्यंत खाली येईल. महाराष्ट्रातील उत्पादनातही घट होणार असल्याने देशात यंदा ३०० लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्यावर्षी देशात ३२० लाख टन साखर उत्पादित झाली होती.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती