महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना

By Admin | Updated: May 30, 2014 23:57 IST2014-05-30T20:18:59+5:302014-05-30T23:57:22+5:30

मुस्लिम समाजात जागृती निर्माण करून समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रमुख मुस्लिम सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम मंचची स्थापना केली आहे

Establishment of Maharashtra Muslim Forum in Mumbai | महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना

महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना

मुंबई : मुस्लिम समाजात जागृती निर्माण करून समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रमुख मुस्लिम सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम मंचची स्थापना केली आहे. मुंबईतील इस्लामिक जिमखाना येथे मंगळवारी मुस्लिम समाजासाठी काम करणार्‍या प्रमुख संघटना आणि विचारवंतांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मंचचे मुख्य संयोजक एफ.एम.ठाकूर यांनी सांगितले.
याआधी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विकासाशी संबंधित मागण्यांसाठी काम करणार्‍या विविध संघटनांना एकाच छताखाली चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. शिवाय संघटना आणि विचारवंतांना काम करताना भेडसावणार्‍या अडचणींवर उहापोह करण्यात आला. त्यावेळी काही सामाईक अडचणी समोर आल्या. त्यात कार्यकर्त्यांचे संख्याबळ आणि आर्थिक चणचण या दोन अडचणींचा समावेश होता. परिणामी वेगवेगळे राहून काम करण्यापेक्षा प्रत्येक संघटनेने स्वत:चे नाव बाजूला ठेवून एकत्र येऊन लढण्यासाठी मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
आतापर्यंत मुख्य शहरातील काही संघटना मंचात सामील झाल्या आहेत. मात्र राज्यभर काम करणार्‍या संघटनांना एकत्र आणण्यासाठी मंचाची भुमिका राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी मंचातर्फे राज्यभर मेळावे घेण्यात येणार आहेत. राज्यातील पहिला मेळावा सोलापूर येथे सोमवारी ९ जून रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक संघटना मंचमध्ये सामील होतील, अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली.
मंचच्या काही प्रमुख मागण्या
महम्मद रहेमान कमिटीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
अंमलबजावणी करण्याआधी अहवाल प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात यावा.
अहवाल प्रसिद्ध करताना त्यात सच्चर कमिटीने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करण्यात यावा.
.............

Web Title: Establishment of Maharashtra Muslim Forum in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.